HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
सौरी अभंग ३७२ पांगूळ अभंग ३७४
फुगडी - अभंग ३७३


श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.



9GOOG
फुगडी

३७३

फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू ।

निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥

मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥

एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥

हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥

सकळ पाहे हरी । तोचि चित्तीं धरी ॥५॥

नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥

वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥

ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥८॥

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2010-02-28T21:14:58.6095408-05:00

Comments | अभिप्राय