HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|चतुःश्लोकी भागवत|
चतुःश्लोकी भागवत भगवत्प्राप्ति चतुःश्लोकी भागवत भगवंताचा धांवा
चतुःश्लोकी भागवत - सृष्टिरचना


मराठी बहुजनसमाजांत श्रद्धा, भक्ति, प्रेम, समता आणि विश्वबंधुत्वाचें अतूट नाते निर्माण करणारे सत्पुरूष म्हणजे पैठणचे महाभागवत श्रीएकनाथमहाराज हेच होत.



58GOOG
स्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला

एवं नाभिकमळीं कमलासन । बैसला केवळ अज्ञान । तंव हदयी झाली आठवण । मी येथें कोण कैचा पां ॥६१॥

मज कैचें हें कमलासन । येथें याचें मूळ तें कवण । तें पाहावया आपण । जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥

सहस्त्रवरुषें बुडी देतां । कमळमूळ नयेचि हाता । तेथें निरबुजला ये वरुता । बैसे मागुता कमळासनी ॥६३॥

विधाता विचारी चारी खाणी । चौर्‍यांसीलक्ष जीवयोनी । या चराचराची मांडणी । सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥

सुर नर आणि पन्नग । उत्तममध्यमअधमभाग । कैसेनी सृजावें म्यां जग । पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥

ऐसी स्त्रष्टा चिंता करी । निश्चळ बैसे कमळावरी । पंचभूतें हीं कवणेपरी । देही देहधारी होतील ॥६६॥

ऐसी तो चिंता करी । चित्त उगें न राहे क्षणभरी । मी कोण मजभीतरी । हें मनी निर्धारी कळेना ॥६७॥

नकळतां माझें मीपण । केवी प्रपंच होय निर्माण । ऐसें चिंतोनी अतिगहन । चतुरानन अनुतापी होत ॥६८॥

Translation - भाषांतर

N/A
58GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2009-11-23T02:05:21.1060432-05:00

Comments | अभिप्राय