HOME|मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|आनंदलहरी|
आनंदलहरी गुरुस्वरुपाची अगम्यता
आनंदलहरी - मोक्षाधिकारी


' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.



9GOOG
म्हणून तुम्हीं सदगुरुंना शरण जाऊन जन्ममरण चुकवून मोक्षाधिकारी व्हावें

सकळां साष्टांग नमन । तुह्मी जावें सदगुरुसी शरण । चुकवावें जन्ममरण । पावावें सुख मोक्षाचें ॥५१॥

सदगुरुमंत्रउपदेश तत्त्वतां । मोक्ष तत्काळ पावे त्वरिता । ऐसें असे यथार्थता । सदगुरुसमान नाहीं सत्यत्वें ॥५२॥

मन असतां आनंदाभीतरीं । उठती सुखाचिया लहरी । ह्नणोनि वदली वैखरी । प्रेम आनंदलहरी या नांव ॥५३॥

एकाजनार्दनी एकनाथ । एक ह्नणते विश्वभरित । तो होउनी कृपावंत । प्रेमे आनंदलहरी वदविली ॥१५४॥

इतिश्रीआनंदलहरी समाप्ता ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री एकनाथ महाराज कृत

आनंदलहरी समाप्त.

Translation - भाषांतर

N/A
9GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2009-11-28T07:48:28.3924864-05:00

Comments | अभिप्राय