HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|तुळशी आरती संग्रह|
तुळशीची आरती वृंदावनवासी जय माये तुळसी
तुळशीची आरती - जय देव जय देवी जय माये तु...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



43GOOG
तुळशीची आरती

जय देव जय देवी जय माये तुळशी ।

निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥

ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।

अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥

सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।

दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।

मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।

सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।

विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।

तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥

त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।

गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
43GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T03:24:35.9052480-04:00

Comments | अभिप्राय