HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
रामचंद्राचीं आरती काय करुं माय आतां कवणा ओव रामचंद्राचीं आरती जय देव जय देव जय मंगलधामा
रामचंद्राचीं आरती - दशरथे रामचंद्रा कौसल्या प...


रामचंद्राचीं आरती

15GOOG
रामचंद्राचीं आरती
दशरथे रामचंद्रा कौसल्या प्रियसुता ।
ओंवाळूं प्रेमभावें जगताचा तूं पिता ॥ धृ. ॥
भक्तांतें तोषवाया अवतरसी रघुवरा ।
प्रेमानें पूजिती जे वर देसी त्यां नरां ॥
घेतांची नाम तुझें सुख झाले शंकरा ।
संकटि तू धांव घेई विनवितो अच्युता ॥ १ ॥
दशवदना मर्दुनिया सोडविले सुरवरा ।
घेउनिया जानकिला आलासी निजपुरा ॥
तोषवुनी सर्व लोका बोळविले वानरां ।
प्रार्थितसे दत्तदास लावी या सत्पंथा ॥ २ ॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:31:41.5586208Z

Comments | अभिप्राय