HOME|mr|aartya|rama|
रामचंद्राचीं आरती परमात्मा श्रीरामा महामाया रामचंद्राचीं आरती काय करुं माय आतां कवणा ओव
रामचंद्राचीं आरती - विडा घ्याहो रामराया । महा...


रामचंद्राचीं आरती

24GOOG
रामचंद्राचीं आरती

विडा घ्याहो रामराया । महाराज राजया ॥ धृ. ॥
रत्नजडित पानदान । आली जानकी घेवोन ॥
विडा देत करुनियां ॥ दीनबंधो रामराया ॥ १ ॥
सुगंध गंगेरी पानें । मुक्त मोतियाचा चुना ॥
सुपारी कातगोळ्या । भक्तिभावें मेळविल्या ॥ २ ॥
जायपत्री जायफळ । विडा जाहला सुफळ ॥
सीता रामलागीं देत ।केशरकस्तूरी युक्त ॥ ३ ॥
सीताराम विडा घेतां । ऎक्यभावे एकात्मता रंगली ऎक्यरंगी ॥
रामदास पाया लागीं ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
24GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:30:11.9998416Z

Comments | अभिप्राय