HOME|mr|aartya|rama|
रामचंद्राचीं आरती आरती करितों राघवचरणीं । रामचंद्राचीं आरती विडा घ्याहो रामराया । महा
रामचंद्राचीं आरती - परमात्मा श्रीरामा महामाया...


रामचंद्राचीं आरती

24GOOG
रामचंद्राचीं आरती

परमात्मा श्रीरामा महामाया जानकी ।
विश्रांती पावली गजर न कीजे सेवकीं ॥ १ ॥
आरती आरत ऎक्यभावें ओवाळूं ॥
प्रकाश स्वयंज्योती । निजतेने बंबाळूं ॥ धृ. ॥
स्नेह ना भाजन नाहीं वाती पावक ।
सबाह्य अभ्यंतरी अवघा निघोर दीपक ॥ आरती. ॥ २ ॥
ऎक्यांचें सुमनशेजे आत्मा रघुपती ।
वाचा पुरुषलिं शब्द न बोलवें पुढती ॥ आरति ॥ ३ ॥
राम आणि दास चैतन्य पहुडले रानी ।
हेंही बोलावयासी दुजा न ऊरे धामी ॥आरती. ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
24GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:29:53.9639072Z

Comments | अभिप्राय