HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
रामचंद्राचीं आरती काय करुं गे माय आतां कवणा रामचंद्राचीं आरती नयना देखत जन हे विलयातें
रामचंद्राचीं आरती - श्यामसुंदर रामाचे चरणकमळी...


रामचंद्राचीं आरती

15GOOG
रामचंद्राचीं आरती

श्यामसुंदर रामाचे चरणकमळी ॥
ओंवाळूं आरती कनकपरियळी ॥ धृ. ॥
वाळा मुग्धा यौवन प्रौढा सुंदरी ॥
आरत्या घेऊनी आलिया नारी ॥ श्याम. ॥ १ ॥
चौघे म्हणती निजगतीं चला मंदिरा ॥
नव त्याही इच्छिती सेवा सुंदरा ॥
श्याम. ॥ २ ॥
दास म्हणे सुमनशेजे चला श्रीहरी ॥
क्षण एक विश्रांति करा अंतरी ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:09:09.3642608Z

Comments | अभिप्राय