HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
पांडुरंगाची आरती निर्जरवर स्मरहधर भीमातिरव पांडुरंगाची आरती सुकुमार मुखकमल । निजसार न
पांडुरंगाची आरती - काय तुझा महिमा वर्णूं मी ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



15GOOG
पांडुरंगाची आरती
काय तुझा महिमा वर्णूं मी किती ॥
नाममात्रें भवपाश पैं तुटती ॥
पाहतां पाऊलें ही श्रीविष्णूमूर्ती ॥
कोटी कुळांसहित जग ते उद्धरती ॥ १ ॥
जय देव जय देव जय पंढरीराया ॥
करूनियां कुर्वंडी सांडीन काया ॥ धृ. ॥
मंगल आरतीचा थोर हा महिमा ॥
आणिक द्याया नाहीं तीस ती उपमा ॥
श्रीमुखासहित देखे जो कर्मा ॥
पासूनि सुटे जैसा रवि नाशी तमा ॥ २ ॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी ॥
जागरण उपवास घडे जयासी ॥
विष्णूचें पुजन एकभावेंसीं ॥
नित्य मुक्त पूज्य तीन्ही लोकांसी ॥ ३ ॥
न बचे वायां काळ जो तुज ध्याती ॥
अखंड तुझा वास तयांच्या चित्तीं ॥
घालें मुखें सदा प्रेमें डुल्लती ॥
तीर्थे मिळणी वास तयांचा पाहती ॥ ४ ॥
देव भक्त तूंची झालासी दोन्ही ॥
वाढावया सुख भक्ति जनीं जडजीवां उद्धार व्हाया लागोनी ॥
शरण तुका वंदी पाऊलें दोन्ही ॥ ५ ॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T21:18:28.0000000Z

Comments | अभिप्राय