HOME|mr|aartya|pandurang|
पांडुरंगाची आरती भक्तीचे पोटीं बोध कांकडा पांडुरंगाची आरती सुंदर अंगकांती मू
पांडुरंगाची आरती - ओंवाळूं गे माये विठ्ठल सब...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


24GOOG
पांडुरंगाची आरती १२

ओंवाळूं गे माये विठ्ठल सबाह्य साजिरा,  सबाह्य साजिरा ॥
राई रखुमाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ. ॥

कनकाचे पर्येळी उजळोनी आरती,  उजळोनी आरती ॥
रत्नदीपशोभा कैसा प्रकाशल्या ज्योती ॥ १ ॥

मंडितचतुर्भुज कानी शोभति कुंडलें, कानी शोभति कुंडलें ॥
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ २ ॥

वैजयंतिमाळ गळा शोभे स्यमंत, गळां शोभा स्यमंत ॥
शंखचक्रगदापद्म आयुधें शोभते ॥ ३ ॥

सांवळा सुंदर जैसा कर्दळिचा गाभा, जैसा कर्दळिचा गाभा ॥
चरणीची नुपुरें वांक्या गर्जतो नाभा ॥ ४ ॥

ओंवाळितां मन माझें ठाकलें ठायी ॥
समाधिस्थ समान तुकय लागला पायी ॥ ओवाळूं ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T21:13:55.0000000Z

Comments | अभिप्राय