HOME|mr|aartya|pandurang|
पांडुरंग आरती संग्रह पांडुरंगाची आरती येई हो विठ्ठले माझे माऊली
पांडुरंगाची आरती - युगें अठ्ठावीस विटेवर उभा...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


24GOOG
पांडुरंगाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥ वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥ चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥ रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा  ॥ धृ ॥

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥ कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥ गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥ सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥ ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥

धन्य पुष्पावती भीमासंगम ॥ धन्य वेणूनाद उभें परब्रह्म ।
धन्य पुंडलीक भक्त निर्वाण ॥यात्रेसी येती साधु सज्जन ॥ जय. ॥ ४ ॥

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥  चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥ पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T19:19:42.0000000Z

Comments | अभिप्राय