HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्रीकृष्ण आरती संग्रह|
श्रीकृष्णाची आरती परमानंदा परम पुरुषोत्तमा श्रीकृष्णाची आरती कंसराये गर्भ वधियेले सात
श्रीकृष्णाची आरती - दैत्यभारें पिडली पृथिवी ब...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



29GOOG
श्रीकृष्णाची आरती

दैत्यभारें पिडली पृथिवी बाळा ।

म्हणवुनि तुला येणें लागे गोपाळा ॥

भक्तप्रतिपालक उत्साह सोहळा ।

मंगळ तुजला गाती नर आणि अबला ॥ १ ॥

जय देव जय देव जय गरुडध्वजा ।

आरती ओंवाळूं तुज भक्तकाजा ॥ धृ. ॥

गुण रुप नाम नाही जयासी ।

जिवीताची तैसा होसी तयासी ॥

मत्स्य कूर्म वराह नृसिंह झालासी ।

असुरां काळा ऎसा पुढें टाकसी ॥ २ ॥

सहस्त्रनामरुपें सावळा ना गोरा ।

श्रुति नेति नेति म्हणति तुज विश्वंभरा ॥

जीवना जीवन तूंची होसी दातारा ।

न कळें पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥ ३ ॥

संता महंता घरी म्हणवी म्हणियारा ।

शंख चक्र गदा आयुधांच्या भारा ॥

दिव्य सुदर्शन घरटी फिरे अवसरा ।

सुकुमार ना स्थूल होसी गोजीरा ॥ ४ ॥

भावेंविण तुझें न घडे पूजन ।

सकळहि गंगा झाल्या तुजपासून ॥

उत्पत्ति प्रलय तूचि करिसी पाळण ।

धरुनि राहिला तुका निश्चयी चरण ॥ जय देव. ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
29GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T01:02:14.4158752-04:00

Comments | अभिप्राय