HOME|mr|aartya|khandoba|
खंडोबाची आरती पंचानन हयवाहन सुरभूषितनीळ खंडोबाची आरती जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार
खंडोबाची आरती - जय देवा खंडेराया । निजशिव...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



24GOOG
खंडोबाची आरती

जय देवा खंडेराया । निजशिवरुप सखया ॥

आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ॥ धृ. ॥

देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर ।

तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥

उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार ।

भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥

स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर ॥

अद्वैतबोध तीव्र । हाती घेउनि तरवार ॥

अहंकार मल्लासूर । त्यातें मारिसी साचार ॥

निवटुनी दैत्यगार । विजयी होसी तूं मल्हार ॥ जय. ॥ २ ॥

निरसोनी द्वैत भाव । करिसी तूं ठाणे अपूर्व । अद्वैतची भक्तदेव ।भेदबुद्धी मिथ्या वाव ।

तुजवीण न दिसे कोणी । जगिं या एकचि तू धणी ॥

मौनी म्हणे तुची सर्व । अससी व्यापक खंडेराव ॥ जय देवा. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:51:10.4449920-04:00

Comments | अभिप्राय