HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|कांकडआरती|
कांकड आरती भक्तीचिये पोटीं बोधकंकडा विठ्ठलाची कांकडआरती उठा पांडुरंगा आतां दर्शन
विठ्ठलाची कांकडआरती - भक्‍तीचिंये पोटीं बोध -का...


कांकड आरती

38GOOG
विठ्ठलाची कांकडआरती

भक्‍तीचिंये पोटीं बोध-कांकडा ज्योती ।

पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ॥ध्रु०॥

ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा ।

दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ॥१॥

काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती ।

कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥२॥

राई रखुमाबाई उभ्या दोन्हीं दो बाहीं ।

मयूरपिच्छें चामरें ढाळिती ठाईंच्या ठायीं ॥३॥

विटेसहित पाय म्हणुनी भावें ओवाळूं ।

कोटी रविशशी दिव्य उगवले हेळू ॥४॥

तुका म्हणे दीप धेडनीं उन्मनींत शोभा ।

विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
38GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T02:14:14.1880496-04:00

Comments | अभिप्राय