HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गुरू आरती संग्रह|
गुरूची आरती ब्रह्मानंद सुखाचा तूं कंद गुरूची आरती दावुनि साक्षई अंतरि भवभय
गुरूची आरती - मनवाणीचा प्रवेश त्वद्रुपी...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



38GOOG
गुरूची आरती

मनवाणीचा प्रवेश त्वद्रुपीं नाहीं ।

फणिवर श्रुति बोले ना ज्यापरतें कांही ॥

सच्चिततत्व पद हें रतिघटना नाही ।

अत्यानंदातितसुख चिद्‌गगनीं पाहीं ॥ १ ॥

जय देव जय देव जय सद्‌गुरुनाथा ।

स्तुती करतां शिणल्या तव निगमागणनाथा ॥ धृ. ॥

हिमकर बहुता पापह वरि तुलना नाहीं

दिनकर कुलवर कोटी तेजासम नाहीं ॥

जगदाभासाबोधें मोहूनि लवलाही ।

शून्यांती तन्मयमन मुनि ध्याती कांही ॥ २ ॥

लवपल जनमन जडलें जरि कां तव नामीं ।

अत्याद्‌भुत करणी शुचि होतो बहुकामीं ॥

कळते शुद्ध निरंजन निर्मळ जो तो मी ।

मुळमायातित होउनि राहें निजधामी ॥ ३ ॥

तो महिमा पाहते पण टाकुनि निजनयनी ।

पाहुनि तन्मयराहे सच्चिद्धनगगनी ॥

अद्वय ब्रह्मानंदामृत प्राशन करूनी ।

नारायण वंदन करि सद्‌गुरुच्या चरणीं ॥ ४ ॥

Translation - भाषांतर

N/A
38GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T02:45:30.6829840-04:00

Comments | अभिप्राय