HOME|mr|aartya|guru|
गुरूची आरती आरती सद्‌गुरुची । सुखल गुरूची आरती ब्रह्मानंद सुखाचा तूं कंद
गुरूची आरती - सगुण हे आरती निर्गुण ओंवा...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



24GOOG
गुरूची आरती

सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं ।

कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ॥ १ ॥

ओंवाळूं आरती सद्‌गुरुनाथा; श्रीगुरुनाथा ।

भावे चरणकमळवरी ठेविला माथा ॥ धृ. ॥

अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं ।

आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ॥ २ ॥

सद्‌गुरुचे पूजन केले षोडशोपचारी ।

रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी ।

ओंवाळूं आरती. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T02:04:30.8158688-04:00

Comments | अभिप्राय