HOME|mr|aartya|etc|
आरती कालभैरवाची उभा दक्षिण पंथे काळाचा का आरती संतांची आरती संतमंडळी । हातीं घ
आरती वटसावित्रीची - अश्वपती पुसता झाला । नार...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



24GOOG
आरती वटसावित्रीची

अश्वपती पुसता झाला ।

नारद सांगताती तयाला ॥

अल्पायुषी सत्यवंत ।

सावित्रीनें कां प्रणीला ॥

आणखी वर वरी बाळें ।

मनि निश्चय जो केला ॥

आरती वडराजा ॥ १ ॥

दयावंत यमदूजा ।

सत्यवंत ही सावित्री ॥

भावें करीन मी पूजा ।

आरती वडराजा ॥ धृ. ॥

ज्येष्ठमास त्रयोदशी ।

करिती पूजन वडाशी ॥

त्रिरात्र व्रत करुनियां ॥

जिंकी तूं सत्यवंताशी ॥

आरती वडराजा ॥ २ ॥

स्वर्गावरी जाऊनियां ।

अग्निखांब कचळीला ॥

धर्मराज उचकला ।

हत्या घालील जीवाला ॥

येई गे पतीव्रते पती नेई गे आपुला ।

आरती वडराजा ॥ ३ ॥

जाऊनिया यमापाशीं ।

मागतसे आपल्या पती ॥

चारी वर देऊनिया ।

दयावंत द्यावा पती ।

आरती वडराजा ॥ ४ ॥

पतिव्रते तुझी कीर्ती ऎकूनि ज्या नारी ॥

तुझी व्रतें आचरती ।

तुझी भुवनें पावती ॥

आरती वडराजा ॥ ५ ॥

पतिव्रते तुझी स्तुती ।

त्रिभुवनी ज्या करिती ॥

स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया ।

आणिलासी आपला पती ।

अभय देऊनिया ।

पतिव्रते तारी त्यासी ॥

आरती वडराजा. ॥ ६ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T03:33:44.7844976-04:00

Comments | अभिप्राय