HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
आरती चंद्राची जय देव जय देव जय श्रीशशिन आरती वटसावित्रीची अश्वपती पुसता झाला । नार
आरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



38GOOG
आरती कालभैरवाची

उभा दक्षिण पंथे काळाचा काळ ।

खङ्‌ग, चक्र वाटी हाती त्रिशुळ ।

गळा शोभे त्याच्या स्फटीकाचीं माळ

आपुलीयादासाचा करतो सांभाळ ।

जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा ।

आरती ओंवाळूं तुझीया मुखकमळ ॥

जय देव जय. ॥

प्रथम काशिपुरी रहीवासी केला ।

दैत्य वधावया क्रोध उपजला ।

काळास मर्दून निष्पाप केला ।

काळभैरव असे नाम पावला ॥ जय. ॥

पूर्वी सुवर्णाची होती सुनगरी ।

तेथे भैरव राज आणि योगेश्वरी ।

रीद्धीसिद्धी त्याच्या अष्टीकानारी ।

ध्यातो त्रिंबकराज निशिदिनी अंतरी ॥ जय. ॥

Translation - भाषांतर

N/A
38GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T03:32:06.3629744-04:00

Comments | अभिप्राय