HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
दशावताराची आरती श्रीरामदासस्वामींची आरती
मनोबोधाची आरती


मनोबोधाची आरती

29GOOG
मनोबोधाची आरती
वेदांचे जें गुह्य शास्त्रांचें जें सार ।
प्राकृतशब्दांमाजी केला विस्तार ॥
कर्म उपासना ज्ञान गंभीर ।
ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥ १ ॥

जय देव जय देव जय मनोबोधा ।
पंचप्राणें आरती तुज स्वात्मशुद्धा ॥ ध्रु ॥

दोन शतें पांच श्र्लोक हे जाण ।
श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥
परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण ।
यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥ २ ॥
Translation - भाषांतर

N/A
29GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-31T01:29:35.9006320Z

Comments | अभिप्राय