HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
संतोषी मातेची आरती जय देवी श्रीदेवी माते । व मंगळागौरीची आरती चल चल सखे पुजना । हस्ताश
एकवीरा देवीची आरती - येई हो एकवीरा देवी माझे म...


एकवीरा देवीची आरती

15GOOG
एकवीरा देवीची आरती

येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।
माझे माऊली ये ॥
दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥
व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।
येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
15GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:38:51.0396384Z

Comments | अभिप्राय