HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
देवीची आरती जय देवी जय देवी जय म देवीची आरती जय जय दीनदयाळे शांते
देवीची आरती - दुर्गे अघसंकट दुर्गे...


देवीची आरती

38GOOG
देवीची आरती

दुर्गे अघसंकट दुर्गे ।
हरि हे कुळस्वामिणी दुर्गे कधि हो मज पावसि मानसरंगे ॥
जय जय भवभंगे दुर्गे ॥ धृ. ॥
उदधील हरीसि तरंगे ।
दिससी जगभास तरंगे ।
स्वरूपीं तूंचि अहंकृतसंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ १ ॥
रचिसी ब्रह्मांड नि:संगे ।
करुणा न करिसी तूं अंगे ॥
त्रिगुणी गुणसाम्यलिलारस अंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ २ ॥
करिसी उत्पत्तिस्थितिभंगे ।
दुर्गे लय हा सत्य विसंगे ॥
तुझिया आनंद पादाब्जसुरंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ ३ ॥
ब्रह्मींब्रह्मार्पण पिंगे ।
फुगडी घालिसि सन्संगे ॥
वंदी हनुमंत पदब्जसुरंगे ।
जय जय भवभंगे दुर्गे ॥ दु. ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
38GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:22:36.0576832Z

Comments | अभिप्राय