HOME|mr|aartya|devi|
देवीची आरती शेजारति ओंवाळूं उन्म देवीची आरती दुर्गे अघसंकट दुर्गे
देवीची आरती - जय देवी जय देवी जय म...


देवीची आरती

24GOOG
देवीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी करवीरी तूं विश्वाच्या लक्ष्मी ॥ धृ. ॥
श्रीपति तुझीया योगें श्रीहरिला नाम ।
ब्रह्मादिकही ध्याती पुरविसी तत्काम ॥
निष्कामें जें भजती पावति निजधामा ।
योगी ध्याने पावति पद आत्माराम ॥ जय. ॥ १ ॥
जपतपसिद्धी तुजविण कांही साधेंना ।
प्रसन्न होतां भक्तां भवभय बाधेना ॥
तुजवाचुनिया अंबे शांती लाधेना ।
वेदांतीचें सारहि शिष्या बोधेना ॥ जय. ॥ २ ॥
गर्जति निगमागम परि वाणिला गौप्य ।
जें जें वर्णिती तें तें माये तव रुप ॥
कोण करि मग तुझ्या सगुणत्वा माप ।
स्तवितां सहस्त्र वदनी श्रमला कीं साप ॥ जय. ॥ ३ ॥
दंभे दर्पे माने क्रोधे जे रहित ।
भजति तव चरणां त्वां साधे आत्महित ॥
उद्धरती ते प्राणीं परिवारासहित ।
देवी त्याला करिसी श्रीपतिसन्निहित ॥ जय. ॥ ४ ॥
बाधा भवभीतीची तव दासां नाही ।
माये न करिसि मोहा चंचळ तें कांही ॥
ह्रदयीं अखंड माझ्या तूं सदये राही ।
गोविंदात्मजविप्रा स्वपदासी पाहीं ॥ जय. ॥ ५ ॥
Translation - भाषांतर

N/A
24GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-14T22:37:13.5840480Z

Comments | अभिप्राय