HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
देवीची आरती करवीरालय वासिनि मंगल देवीची आरती सुरवरदायिनी मुरहरसुख
देवीची आरती - कोल्हापुरी देवी तूं ...


देवीची आरती

29GOOG
देवीची आरती

कोल्हापुरी देवी तूं रहिवास केला ।
मातुनि दैत्यदानव धर्म स्थापीला ॥
देवा सुरवरां आनंद जाहला ।
सकळहि मिळुनी येती तुझ्या भेटीला ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
आरती ओंवाळूं शरण आहें मी ॥ धृ. ॥
चौसष्ट योगिनी रात्री सेवेसी ।
अडसष्ट तीर्थे तीं आली महिमेसी ॥
मानव सकळिक येती तेथें स्नानासीं ।
त्यांची सकळहि पापें जातीं भंगासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अवतार पूर्ण तो धरिला देवीनें ।
त्रिकाळ पूजा अर्चन होत सन्मानें ॥
पृथ्वीवरी वार्ता गेली महिमेने ॥
कृष्णसुत चरण धरितो भावानें ॥ जय देवी. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
29GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-24T02:13:02.1745088Z

Comments | अभिप्राय