HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी श्रीदत्तप्रभूची दत्तदिगंबरा ऊठ करुणाकरा भूपाळी श्रीदत्तात्रेयाची उठिं उठिं बा दत्तात्रेया
भूपाळी श्रीदत्तप्रभूची - पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



49GOOG
भूपाळी श्रीदत्तप्रभूची

पहाटेसी उठोनि भक्त हर्षुनियां चित्तीं ।

दत्तगुरुप्रति भेटूं येती सह्याद्रीवरती ॥ध्रु०॥

कृतवीर्यात्मज सहस्त्रबाहू अर्जुन तो पुढती ।

कयाधुसुत जो भागवतोत्तम प्रहलाद सुमती ॥१॥

ययातिसुत यदु ज्याच्या वंशा देवही वंदीती ।

मदालसेचा नंदन चौथा अलक जया म्हणती ॥२॥

सुरतपानामक भूसुर मुनिवर विष्णुदास सुमती ।

अन्यहि येती सुरमौनितती करिती ते प्रणती ॥३॥

अनसूयेच्या बाळा दत्ता करितो तुज विनती ।

उठी उठी विमला, अरुण उदेला सरली हे राती ॥४॥

मंगलधामा मेघश्‍यामा, उठी उठी तुं निगुती ।

अरुण उदेला, प्रकाश पडला पक्षी गलबलती ॥५॥

कुंकुंम माखुनि प्राचीकामिनी हर्षुनि आत्मपती ।

येतो म्हणुनि ये लगबगुनी लाटीनम पुढती ॥६॥

द्विजाती उठती वेदा पुढती वासुदेव प्रार्थी ।

उठी उठी दत्ता श्रीगुरुनाथा दावी सुखदीप्ती ॥७॥

Translation - भाषांतर

N/A
49GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:49:28.4015936-04:00

Comments | अभिप्राय