HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी संतांची उठिं उठिं बा पुरुषोत्तमा भूपाळी श्रीदत्तप्रभूची पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन
भूपाळी श्रीदत्तप्रभूची - दत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



15GOOG
भूपाळी श्रीदत्तप्रभूची

दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा । पहाट झाली पुरे झोंप आतां ।

भक्तजन हे उभे वाट पाहती सभे । दर्शनें देई त्यां शीघ्र शांता ॥ध्रु०॥

अरुण तम दूर करी कुंकुमें नभ भरी । बापडी ही उषा पदर पसरी ।

गंग खळखळ करीं त्वद्यशें जगभरी । मंद वाहे कशी अनिललहरी ॥दत्त०१॥

वनगंधर्व हे सुस्वरें गाइती । मोर केकारवें नृत्य करिती ।

मुनिकुलें गर्जती वेदमंथगिरा । ऊठ बा श्रीधरा राधु पठती ॥दत्त०२॥

षट्‌पदें पद्मदलीं गुंजती प्रियकरा । भेटती ही मुद्रा चक्रपिल्ली ।

रंग कष्टी उभा पाहूं दे मुखप्रभा । लोळूं दे सतत बा चरणकमळीं ॥दत्त०३॥

Translation - भाषांतर

N/A
15GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:47:36.8311632-04:00

Comments | अभिप्राय